top of page

एक कोटी १० लाख लसीच्या डोससाठी सरकारकडून सीरमला ऑर्डर

भारताने सीरम आणि भारत बायोटेकच्या लसीचा आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली असून येत्या १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होणार आहे.या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला कोरोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे. सरकार सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी १० लाख डोस खरेदी करणार आहे. जीएसटीसह लसीच्या प्रत्येक डोसची किंमत २१० रुपये असून आज संध्याकाळपासूनच लसीची डिलिव्हरी पाठवण्यास सुरुवात होईल असे अधिकाऱ्याने सांगितले.

bottom of page