top of page

भाजपच्या मंत्री सरकारी कार्यालयात आल्या आणि,,,

मध्य प्रदेशच्या पर्यटन मंत्री उषा ठाकूर आणि त्यांच्या समर्थकांनी वन विभागाच्या कार्यालयात येऊन गोंधळ घातला. तसेच वन विभागाने अनधिकृतपणे खोदकाम केल्याप्रकरणी जप्त केलेला जेसीबी, ट्रॅक्टर ट्रॉली कार्यालयामधून कोणाचीही परवानगी न घेता जबरदस्तीने घेऊन गेले आहेत. याबाबत वनपाल राम दुबे यांनी अर्ज पोलिसांकडे केला आहे. या अर्जासोबत एक व्हिडीओही पोलिसांना देण्यात आला आहे. या प्रकरणी वन मंत्री विजय शाह यांनी वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष गटाची स्थापना करण्यात आलीय.

bottom of page