top of page

तुळजाभवानी मंदिरात दररोज चार हजार भाविकांना घेता येणार दर्शन

उस्मानाबादः कोरोनामुळे गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले तुळजापुरातील श्री तुळजाभवानी देवी मंदिर राज्य सरकारच्या निर्णयानंतर सोमवार १६ नोव्हेंबरपासून दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. सरकारच्या नियम व अटींनुसार मंदिरात दररोज चार हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना प्रवेश पास, मास्क, सुरक्षित वावर नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने याबाबत नियम व अटी जाहीर केल्या आहेत.

bottom of page