top of page

जाता जाता ट्रम्प प्रशासनाचा भारताला मैत्रीपूर्ण सल्ला

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आज राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. यापूर्वी मावळते राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी दिलेल्या भाषणामध्ये अमेरिकेतील जनतेला संबोधित केलं. यामध्ये त्यांनी ६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसेबद्दल दु:ख व्यक्त केलं. याचवेळी ट्रम्प प्रशासनाने मित्रदेश असणाऱ्या भारताला दोन देशांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून काम करणाऱ्या माइक पोम्पिओ यांनी भारतासाठी एक खास ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी ब्राझील आणि भारतीय नागरिकांना चीन आणि रशियापासून धोका असल्याचं म्हटलं आहे.

bottom of page