top of page

बिहारमध्ये पुढच्या वर्षीही निवडणुका होऊ शकतात -तेजस्वी यादव

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार येऊन महिना झालेला नाही. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केलेल्या गौप्यस्फोटानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी बिहारमध्ये पुढच्या वर्षीही निवडणुका होऊ शकतात, त्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

bottom of page