top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
एक घोटाळेबाज तर दुसरा धोकेबाज...
काँग्रेसेचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी छपरा येथील प्रचार रॅलीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये डबल इंजीनचे सरकार नाही, तर धोकेबाज आणि घोटाळेबाज सरकार आहे, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. सुरजेवाला यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ”मोदीजी, २०१५ मधील निवडणुकीत नितीश कुमार यांना १८ व्या शतकातील मानसिकतेचे म्हणाले होते. आज त्यांना छपरा येथे डबल इंजीन म्हणत आहेत. मात्र सत्य हे आहे की, हे डबल धोक्याचे सरकार आहे. एक घोटाळेबाज आणि एक धोकेबाज, बिहारची जनता करणार दोघांचा उपचार! बोले बिहार बदलें सरकार”
bottom of page