top of page

बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकून विद्यार्थिनीचा मृत्यू

दिवाळीला कुटुंबीयांसमवेत नातेवाईकाकडे जाणाऱ्या अस्मिता छगन भिलावेकर (वय १६, रा. भुलोरी) या विद्यार्थिनीचा बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धारणी तालुक्यात घडली. ती टेंब्रुसोडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत नवव्या इयत्तेत होती. अस्मिताचे आई, वडील, आजी आणि आजोबा हे तिच्या मावशीकडे मन्सूधावडी येथे बैलगाडीने निघाले होते. रस्त्यात अस्मिताच्या गळ्यातील ओढणी बैलगाडीच्या चाकात अडकल्याने तिला गळफास लागला. काही क्षणात तिचा मृत्यू झाला. अस्मिताच्या कुटुंबीयांनी गळफास सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, ओढणी काढता आली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

bottom of page