top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन
जळगाव - शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम-2021 करीता 100 किलो बियाणे प्रती हेक्टर याप्रमाणात आलेल्या उत्पादनातुन सोयाबीन बियाणे म्हणून राखून ठेवावे असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. सोयाबिन पिकाची सद्य:स्थितीत काढणी व मळणी सुरु असुन आलेल्या उत्पादनातुन चांगल्या प्रतीचे सोयाबिन बियाणे राखुन ठेवून ते पुढील खरीप हंगामात बियाणे म्हणून वापर करावा. साठवणुक करतांना सोयाबिन बियाणे गोणीची थप्पीची उंची 7 फुटापेक्षा जास्त ठेऊ नये. सोयाबिन बियाणाचे कवच नाजुक असल्यामुळे त्याची कमीत कमी हाताळणी करावी. पुढील हंगामासाठी घरचे बियाणे राखुन ठेवल्याने शेतकरी बांधवांना बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही. असेही ठाकूर यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
bottom of page