top of page

श्रीलंकेत बुरख्यावर बंदी

श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्यात येणार असून एक हजाराहून अधिक मदरसेही बंद करण्यात येणार असल्याचे श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षामंत्री सरथ वीरशेखर यांनी शनिवारी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बुरख्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी आपण स्वाक्षरी केली असून तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे, असे वीरशेखर यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

bottom of page