top of page

शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवणार-संजय राऊत

आगामी पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक शिवसेना लढणार असल्याची घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात येत आहोत, असा संदेशही राऊत यांनी ट्विटरवर दिला. तसेच शेवटी बंगाली भाषेत ‘जय हिंद’ अशी घोषणाही त्यांनी केली.

bottom of page