top of page

सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गांगुलीला बुधवारी पुन्हा हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसापूर्वीच गांगुलीला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतला होता.

bottom of page