top of page

शेअर बाजारात मोठी घसरण

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांनी बुधवारीही नफेखोरी सुरु ठेवल्याने आज दिवसभरात सेन्सेक्स जवळपास 1 हजार अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी 271.40 अंकांनी कोसळून 14 हजाराच्या खाली गेला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये सेन्सेक्स जवळपास 2,350 अंकांनी खाली घसरला आहे. त्यामुळे सध्या सेन्सेक्स 47,409.93 च्या पातळीवर आहे. या घसरणीचा सर्वाधिक फटका बँकांना बसला आहे. जवळपास सर्वच क्षेत्रातील समभागांवरील विक्रीचा मारा वाढल्याने निर्देशांकात घसरण झाली.

bottom of page