
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
सॅटलाइटद्वारे मशीन गन कंट्रोल करुन शास्त्रज्ञाची हत्या
अत्याधुनिक टेक्नोलॉजी वापरुन इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे मुख्य शास्त्रज्ञ मोहसीन फाखरीझादेह यांची मागच्या आठवडयात हत्या करण्यात आली. मोहसीन फाखरीझादेह यांच्यावर सॅटलाइटने नियंत्रित होणाऱ्या मशीन गनमधून गोळया झाडण्यात आल्या. रेव्हेल्युशनरी गार्डच्या उप कमांडरने रविवारी स्थानिक मीडियाला ही माहिती दिली. इराणची राजधानी तेहरान बाहेरील रस्त्यावरुन मोहसीन फाखरीझादेह हे कारमधून जाताना त्यांच्या चेहऱ्यावर झूम करुन मशीन गनने १३ गोळया झाडल्या अशी माहिती अॅडमिरल अली फादावी यांनी दिली. निसान पिकअपच्या छोटया ट्रकवर ही मशीन गन बसवण्यात आली होती. मशीन गनने मोहसीन फाखरीझादेह यांच्या चेहऱ्याभोवती फोकस करुन गोळया झाडल्या. फाखरीझादेह यांच्यापासून त्यांची पत्नी १० इंच अंतरावर बसली होती. पण तिला एकही गोळी लागली नाही. “सॅटलाइटच्या माध्यमातून मशीन गन ऑनलाइन कंट्रोल करण्यात आली. असे अली फादावी यांनी सांगितले.