top of page

साताऱ्यातील मेरुलिंग घाटात कारचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

सातारा जिल्हयातल्या जावली तालुक्यातील मेरुलिंग घाटात आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास इर्टिगा कारच्या झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 5 जण जखमी झाले आहेत. शिवाजी जगन्नाथ साबळे (वय 40), लिलाबाई गणपत साबळे (वय 55) आणि सागर सर्जेराव साबळे (वय 32) अशी अपघातातील मृतांची नावं आहेत. मेरुलिंग येथून रेशनिंग आणण्यासाठी जात असताना मेरुलिंग घाटातील एका वळणावर भरधाव वेगाने जाणार्‍या कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. त्यात या तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहे. अपघातातील जखमींना मेढा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

bottom of page