top of page

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला अन् ...

सातारा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसोहळ्यासाठी आता संख्येचीच नाही तर वेळेचीही मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र नियमांचं उल्लंघन करून सातारा जिल्ह्यातील रासाटी (ता. पाटण) या गावात लग्नानंतर रात्री डीजे लावून वऱ्हाडी नाचत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. या व्हायरल व्हिडिओमुळे हा प्रकार उघडकीस आला. हा व्हिडिओ पाहून पाटणचे तहसीलदार आणि पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत संबंधित व्यक्तींना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

bottom of page