top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट; महिलेचा मृत्यू
कोरोना काळात एकीकडे वारंवार सॅनिटायचा वापर करा असं सांगितलं जात असताना कोल्हापुरात सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाल्याने महिलेचा दुर्दैवी अंत आला आहे. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सुनीता काशीद आपल्या घरातील कचरा पेटवत होत्या. यावेळी त्याच्यामध्ये सॅनिटायझरची बाटलीदेखील होती. त्यात शिल्लक असणाऱ्या सॅनिटायझरमुळे बाटलीचा स्फोट झाला आणि सुनीता काशीद आगीत होरपळून गंभीर जखमी झाल्या होत्या. कागल तालुक्यातील बोरवडे येथे २७ डिसेंबरला ही घटना घडली आहे. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
bottom of page