top of page

…म्हणून रोहित शर्मा

ऑस्ट्रेलियाच्या आगामी दौऱ्यासाठी भारताचे तिन्ही संघ जाहीर करण्यात आले आहेत. पण या तिन्ही संघांमध्ये रोहित शर्माला स्थान देण्यात आलेले नाही. रोहित शर्मा सध्या आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने स्पर्धेत चांगली कामगिरी केली असून पंजाबविरूद्ध झालेल्या सुपर ओव्हरमध्ये त्याच्या स्नायूंची दुखापत झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या संघात रोहितला स्थान देण्यात आलेले नाही. रोहित शर्माच्या दुखापतीबाबत बीसीसीआयची वैद्यकीय समिती लक्ष ठेवून आहे, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

bottom of page