top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
.... अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही
काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक माध्यमांमध्येही तसेच सोशल मीडियामध्येही अशा बातम्यांचे मेसेज व्हायरल झालेत. अखेर याची दखल घेत सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी) या वृत्तात कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच “आरबीआयकडून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही” असंही पीआयबीने स्पष्ट केलंय. ट्विट करत ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने ही माहिती दिली. व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआयबी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं असून या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं जातं.
bottom of page