top of page

आरबीआय केंद्र सरकारला देणार तब्बल ९९,१२२ कोटींची अतिरिक्त रक्कम

कोरोना संकटात आरबीआयनं खजान्यातील ९९,१२२ कोटी रुपये केंद्र सरकारला वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बोर्डाच्या बैठकीत जुलै २०२० ते मार्च २०२१ या कालावधीतील ९ महिन्यांची ९९,१२२ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम केंद्र सरकारला वर्ग करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतही चर्चा करण्यात आली.

bottom of page