top of page

पुढच्या दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार - दानवे

राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचं भाजपाच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल, असा दावा केला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे परभणी येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. “राज्यात सरकार कसं स्थापन होईल, हे मी आता सांगणार नाही. मात्र, सरकार स्थापन झाल्यावर आपण महाविकास आघाडीला हे सांगू. आम्ही सध्या फक्त होणाऱ्या निवडणुका पार पडण्याची वाट बघत आहोत. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेऊन काम करायचं की, महाराष्ट्रात आपण सरकार स्थापन करणार आहोत,” असं आवाहन दानवे यांनी केलं.

bottom of page