top of page

अयोध्येत २०० फूट खोदकाम करुनही खडक लागला नाही- स्वामी गोविंददेव गिरी महाराज

अयोध्येत होणार्‍या राम मंदिराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. हे मंदिर भव्य दिव्य उभारले जाणार आहे. या कामाला साडे तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार असून सध्या काम सुरु आहे. त्या ठिकाणी २०० फूट खोदकाम करूनही खडक लागलेला नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तिथे काम केले जात आहे अशी माहिती राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली आहे.

bottom of page