top of page

एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार

राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. विष्षू गुर्जर असं या आरोपीचं नाव आहे. पीडित कुटुंबाच्या घराजवळच त्याचा ढाबा असून आरोपी मागील एक वर्षांपासून कुटुंबातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपी महिलेच्या लहान बहिणी आणि मुलीलाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती महिलेला मिळताच तिने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. कुटुंबातील इतर सदस्यांना याची माहिती मिळताच त्यांनीही पोलिसांकडे संपर्क साधला. २१ जानेवारीला आरोपीविरूद्ध प्रथम तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच दिवशी महिलेच्या बहिणीनेही आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे संपर्क साधला. आरोपीविरोधात २३ आणि २४ जानेवारीला बलात्काराच्या दोन तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

bottom of page