top of page

महागाई, काळे कायदे..

राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका देशातील जनतेवर महागाईची कुऱ्हाड कोसळली असून ती सहन करण्याच्या पलिकडे गेली आहे. शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणले गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांवर लाचार होण्याची वेळ आली आहे. हे सगळं घडत असताना फक्त निवडक मित्रांचा फायदा करुन देत मोदी सरकार गप्प बसलं आहे अशा आशयाचं ट्विट करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देशातला शेतकरी आधीच अनेक संकटांशी सामना करत आहे, अशातच केंद्र सरकारने हे काळे कायदे आणून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. कृषी कायद्यांवरुन देशातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून देशभरात आंदोलनेही करण्यात आली. नुकतेच पंजाब सरकारने ही या कायद्याविरोधात विधानसभेत ३ विधेयकेही संमत केली आहेत. आज राहुल गांधी यांनी कृषी कायदे आणि वाढती महागाई यांचा संदर्भ घेऊन पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत ९४ व्या स्थानी पोहचल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला त्यावरुनही राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर महागाई आणि कृषी कायद्यांवरुन टीका केली आहे. देशात महागाई प्रचंड वाढलेली असताना मोदी सरकार फक्त आपल्या काही मित्रांचं भलं करत आहे, असंही राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा म्हटलं आहे.

bottom of page