top of page

उद्यापासून पुण्यात कोचिंग क्लास सुरु

पुणे : मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर पुण्यात विविध आस्थापनांबरोबर, शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर मिशन बिगिन अगेन अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करत पुण्यात विविध गोष्टी सुरु झाल्या. आता पुणे महानगरपालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व शैक्षणिक संस्था कौशल्य विकास, टायपिंग व संगणक प्रशिक्षण संस्था, इयत्ता ९ वी पासून पुढील कोचिंग क्लासेस उद्यापासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना सॅनिटायझशन, सोशल डिस्टन्सिंग बाबतच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करावे लागणार आहे.

bottom of page