top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
पुणे विमानतळ १४ दिवसांसाठी राहणार बंद
पुणे विमानतळावरील व्यावसायिक विमानांची उड्डाणं १४ दिवसांसाठी बंद राहणार असल्याचे भारतीय हवाई दलानं रविवारी कळवलं आहे. त्यानुसार, २६ एप्रिल २०२१ ते ९ मे २०२१ या काळात विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे. सध्या या विमानतळावर रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. दरम्यान, रात्रीच्या सर्व प्रकारची विमान उड्डाणं आणि लँडिंगच्या सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. रात्रीच्या साधारण १० विमान सेवा या दिवसाच्या वेळेत बदलण्यात आल्या आहेत. लॉकडाउनच्या आधी पुणे विमानतळावर २,५३० मीटरची एकच धावपट्टी कार्यरत होती. यावरुन दिवसभरात साधारण १७० विमान उड्डाण होतं होती, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.
bottom of page