top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
एक देश एक निवडणूक ही देशाची गरज : पंतप्रधान
देशात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी दर महिन्यात निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला पाहिजे, एक देश एक निवडणूक ही देशाची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केवडिया येथे संविधान दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसंच ही जखम आपण कधीही विसरु शकणार नसल्याचंही म्हटलं. आपण कागदांचा वापरही पूर्णपणे बंद केला पाहिजे. पूर्णत: डिजिटल होण्याकडे वाटचाल करणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्षाकडे पाहता आपण हे लक्ष्य साधलं पाहिजे,” असंही ते म्हणाले.
bottom of page