top of page

पंतप्रधान मोदी करणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून शुक्रवारी देशभरात ड्राय रनचा दुसरा टप्पाही पार पडला. त्यानंतर देशात लवकरच लसीकरणास सुरुवात होणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी असं सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. याबाबत सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. सोमवारी दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे.

bottom of page