top of page

पंतप्रधानांनी केलं 'व्होकल फॉर लोकल'चं आवाहन

नव्या वर्षात भारतात दोन लसींना परवानगी मिळाल्यानं भारतात लवकरच कोरोना लसीकरण सुरू होत आहे. आम्हाला देशातील वैज्ञानिकांचा अभिमान आहे. असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानावर जोर दिला. राष्ट्रीय हवामान परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना मोदींनी वस्तू व सेवांच्या गुणवत्तेवर भर देण्याचं आवाहन केलं. यावेळी मोदींनी व्होकल फॉर लोकलचा नारा देत भारतीय वस्तू जगातील बाजारापर्यंत नेण्याचं आवाहन केलं.

bottom of page