top of page

प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, पत्रकारांवर गुन्हे दाखल केले जात असल्यावरूनही त्यांनी टीका केली आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद केली आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र ते हे विसरले आहेत की शेतकऱ्यांचा आवाज जेवढ्या प्रमाणात दाबला जाईल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठतील. असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

bottom of page