top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 9 August 2026
राज्यातून परतीच्या पावसाला सुरुवात
परतीच्या पावसाला राज्यातून आजपासून सुरुवात झाल्याची माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख दत्तात्रय होसाळीकर यांनी दिली. सूर्यप्रकाश आणि काहीशा ढगाळ वातावरणात विदर्भ, मराठवाड्यातील काही भागातून, उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागातून आणि उत्तर कोकणातून आजपासून पावसाने माघार घेतली आहे. परतीच्या पावसाचा हा प्रवास डहाणू, नाशिक, नांदेड आणि नलगोंडा (तेलंगाणा) आणि इतर भागातून होत आहे. “घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे” या काव्यमय पंक्तींसह ट्विट करत.होसाळीकर यांनी ही माहिती दिली. पुढील २४ तासांत राज्यातील बहुतांश भागात परतीच्या पावसासाठी हवामानाची स्थिती अनुकूल असल्याचेही होसाळीकर यांनी सांगितलं आहे.
bottom of page