top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
"टायगर अभी जिंदा है... "
स्थापनेपासून भाजपात असलेले नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षांतर करत राजकीय सीमोल्लंघन केलं. या वेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ”एकनाथ खडसे ४० वर्षांपासून ते काम करत आहे. पण, पहिल्या रांगेतील नेत्याला भाजपानं सभागृहात शेवटच्या रांगेत नेऊन बसवलं. खडसेसाहेबांवर अन्याय झाला, कटकारस्थानं रचली गेली असतील. खडसेंच्या अन्यायबाबत सर्वाधिक मीच बोललो असेल. मी सभागृहातही प्रश्न विचारला होता. कटप्पाने बाहुबलीला का मारलं, असं मी त्यावेळी विचारलं होतं. याचं उत्तर आजही मिळालं नाही. आजही ते (भाजपा नेते) टिव्हीवर कार्यक्रम बघत असतील. त्यांना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है,” अशी टोलेबाजी करत जयंत पाटील यांनी भाजपा नेत्यांना चिमटे काढले.
bottom of page