top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
शेतकरी आंदोलन : पलवालमध्ये २००० लोकांवर गुन्हा दाखल
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडसाठी निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना हरयाणाच्या पलवाल येथे रोखण्यात आल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांच्या बॅरिकेट्सची मोडतोड केली होती. याप्रकरणी २००० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, भादंवि कलम १८६, ३३२, ३५३, ३०७, ४२७ तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्याच्या कलम ८ नुसार सुमारे २००० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गादपुरी पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबलने याबाबत तक्रार दाखल केली आहे.
bottom of page