top of page

राज्यभरात कांद्याची मोठय़ा प्रमाणात आवक

पुणे, वाशी, नाशिकसह राज्यातील बाजारसमित्या तसेच उपबाजारात जुन्या कांद्याची मोठी आवक आहे. नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाल्यामुळे साठवणूक करण्यात आलेला जुना कांदा शेतकरी बाजारात विक्रीस पाठवीत आहेत. परिणामी, महिनाभरापूर्वी तेजीत असलेल्या जुन्या कांद्याच्या दरात निम्म्याने घट झाली आहे. गेल्या चार दिवसात पुणे बाजारात २०० ट्रक एवढी कांद्याची आवक झाली. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठ दिवसात २८ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. नाशिक जिल्ह्य़ातील लासलगाव बाजार समितीमध्ये गेल्या पंधरा दिवसात तीन लाख १३ हजार ५३९ क्विंटल एवढा जुना कांदा तर ११ हजार १६१ क्विंटल एवढा नवा कांदा आला आहे.

bottom of page