top of page

देशात कोरोना लसीकरण ऐच्छिक

भारतात विकसित करण्यात आलेल्या लशी इतर देशांतील लशीइतक्याच परिणामकारक असून देशात कोरोना प्रतिबंधक लस घेणे नागरिकांसाठी ऐच्छिक राहील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.लशीची कुणावर सक्ती केली जाणार नाही. पण लस घेतलेले केव्हाही चांगले असेल. ती अर्धवट मात्रेत घेऊ नये तर पूर्ण दोन मात्रा घेतल्या जाव्यात. त्यामुळे त्या व्यक्तीचे करोनापासून संरक्षण होईल व इतरांनाही त्याची बाधा होणार नाही.

bottom of page