
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता
नंदुरबार : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मेडीकल ॲसेसमेंट ॲण्ड रेटींग बोर्डाने नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यावर्षी प्रथम वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी नोडल अधिकारी डॉ.प्रविण ठाकरे उपस्थित होते. गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात येत होती. प्रशासनाने यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली होती. त्यानुसार केंद्राच्या पथकामार्फत महाविद्यालयासाठी आवश्यक सुविधांची पाहणीदेखील करण्यात आली होती.
प्रथम वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. ही परवानगी पहिल्या वर्षासाठी असून बोर्डाच्या पुढील तपासणीनंतर दुसऱ्या बॅचला परवानगी देण्यात येणार आहे. बोर्डाच्या नियमानुसार 15 टक्के जागा केंद्राच्या कोट्यासाठी वर्ग करण्यात आल्या आहेत. उर्वरीत 85 जागांसाठी प्रवेश प्रक्रीया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ.ठाकरे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाचे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. महाविद्यालयासाठी आवश्यक बाबींची पूर्तता लवकर करावी आणि काही सुविधा आवश्यक असल्यास त्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.