top of page

वेब सीरिज पाहून रचला हत्येचा कट, आरोपीची कबुली

फरीदाबाद : निकिताची हत्या वेब सीरिज मिर्झापूर पाहून केल्याचे आरोपी तौसीफ याने आपल्या जबाबात म्हटले आहे. या वेब सीरीजमध्ये मुन्ना भैया (दिव्येंदु शर्मा) देखील एकतर्फी प्रेमातून स्वीटीवर (श्रेया पिलगांवकर) गोळी झाडतो, त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थीनी निकिताची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. तौसिफने पोलीस कस्टडीमध्ये असताना त्यानेच निकिताची हत्या केल्याचा आरोपी कबुल केला आहे. मिर्झापूर वेब सीरिज पाहिल्यानंतर निकिताच्या हत्येचा प्लान बनविल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

bottom of page