top of page

काय घडलं 'त्या' पार्टीत?

खार परिसरात भगवती हाईट्स या इमारतीच्या गच्चीवर ३१ डिसेंबरच्या पार्टीत जान्हवी कुकरेजा या तरुणीची हत्या झाली होती. या प्रकरणी अटक केलेल्या श्री जोगधनकर आणि दिया पडळकर यांची ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र, पार्टीत सहभागी झालेल्यांच्या जबाबातून वेगवेगळी माहिती पुढे येत असल्याने नेमके त्या पार्टीत काय घडले, याचा शोध पोलिस घेत आहेत. ही हत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली आहे का, याबाबतही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

bottom of page