top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Wednesday, 5 August 2026
कोरोनापेक्षाही भयंकर विषाणूच्या संसर्गाचा धोका?
वर्षभराहून अधिक काळापासून सुरु असणाऱ्या या कोरोनाच्या संसर्गामुळे जगभर हाहाकार उडाला. आता अनेक देशांनी लसींना मंजुरी देऊन लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. असं असतानाच आता आणखी एक कोरोनापेक्षाही धोकादायक अशा विषाणूचा सामना करण्यासाठी जगाने तयार रहावं, असा इशारा इबोला विषाणूचा शोध लावणारे वैज्ञानिक जीन-जॅक्स मुयेम्बे तामफूम यांनी एका मुलाखती दरम्यान दिला आहे. जीन यांनी या आजाराला डिसीज एक्स असं म्हटलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये या आजाराचे रुग्ण असून कांगोमध्येही या आजाराने अनेक रुग्ण आढळून येत असल्याचा दावा जीन यांनी केलाय.
bottom of page