top of page

सावधान ! ब्रिटनमधून आलेले २० प्रवासी निघाले पॉझिटिव्ह

ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू झपाट्यानं पसरल्यानं ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. बुधवारपासून ३१ डिसेंबपर्यंत भारत आणि ब्रिटनमधील विमानसेवा बंद राहणार असून कोरोनाचा नव्या प्रकार रोखण्यासाठी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. मंगळवारी ब्रिटनमधून भारतात विविध ठिकाणी असंख्य प्रवासी दाखल झाले.त्यामधील २० प्रवासी पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या माध्यमातून नव्या कोरोनानं भारतात शिरकाव, तर केला नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

bottom of page