top of page

राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एक प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एक परिवर्तनवादी निर्णय घेत 'एलजीबीटी' (लेस्बियन, गे, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर) सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एलजीबीटी समुदायाचा पक्षातंर्गत सेल करणारा राष्ट्रवादी पहिलाच पक्ष ठरला आहे. पक्षाच्या ट्विटर हँडलवर या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. एल.जी बी. टी. समुदायला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा नविन सेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जयंत पाटील यांच्या हस्ते व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील पक्ष कार्यालयात या सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्वीटद्वारे देण्यात आली आहे.

bottom of page