
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश निवड चाचणीसाठी 15 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन
जळगाव - केंद्र सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव (भुसावळ) जिल्हा जळगाव येथील इयत्ता 6 वी च्या सन 2021-22 प्रवेशाकरीता होणाऱ्या निवड चाचणीसाठी आवेदनपत्र व माहितीपत्रके उपलब्ध झालेले आहेत. 15 डिसेंबर, 2020 पर्यंत www.navodaya.gov.in & https#//www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Jalgaon/en/home/ या बेवसाईटवर संबंधीतांना नोंदणी करता येणार आहे.
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वीमध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व शासनमान्य विद्यालयात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या निवड चाचणी परीक्षेकरीता फक्त ऑनलाईन अर्ज करता येतील, याची सर्व पालक, शिक्षक, विस्तार अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी नोंद घ्यावी. अर्ज भरण्यापूर्वी सर्व संबंधीतांनी वरील वेबसाईटवर उपलब्ध असलेले माहितीपत्रक सविस्तर वाचावे म्हणजे अर्ज भरतांना त्रुटी राहणार नाही. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी जी. आर. सरनाईक 9404900916 शैलेन्द्रकुमार नागवंशी 8600675876, एस कोवे 9421495883 यांचेशी संपर्क साधावा.
प्रवेश निवड चाचणी परीक्षा शनिवार, 10 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 11.30 ते 1.30 या वेळेत जिल्ह्यातील नियोजित परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी / पालकांनी / शिक्षकांनी वरील वेबसाईटवरुन माहिती पत्रकात उपलब्ध असलेले मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करुन निवड चाचणीसाठी प्रविष्ट व्हावे व नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशासाठी पात्र ठरण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर खंडारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.