top of page

नाशिक महापालिकेत शिवसेना-भाजपचे नगरसेवक आमने-सामने

नाशिक: वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी ऑनलाईन महासभेत घुसून महापौरांना दूषित पाण्याबाबत जाब विचारला. प्रशासनाकडून योग्य उत्तरे मिळत नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करून सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावरून सभागृहात प्रचंड आरडाओरड सुरू झाली. राजदंड पळवण्यावरून भाजप-सेनेचे नगरसेवक एकमेकांना भिडले. सभागृहात शिवसेना-भाजप नगरसेवकानी एकमेकांवर आरोप सुरू केले. हा वाद अधिकच चिघळल्याने महापौरांनी अखेर महासभा तहकूब केली.

bottom of page