top of page

नागपूरमध्येही शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंदच

नागपूर: कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता 23 नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या शाळा सध्या सुरू न करता 13 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्यात येतील, असा आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी जारी केला आहे. अनेक शिक्षकांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून स्थानिक प्रशासनाच्या संमतीने सुरू करता येतील, असे आदेश दिले होते. त्यानुसार, नागपूर महानगरपालिकेच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यासंदर्भात मनपाने तयारी केली होती.

bottom of page