top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
तडीपार गुंडाने केला सहाय्यक उपनिरीक्षकाचा खून
पुणे : तडीपार गुंडाने चक्क सहाय्यक उपनिरीक्षकाचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद हे काल रात्री ड्युटी वरून घराकडे निघाले होते. त्यावेळी गुंड प्रवीण महाजनने त्यांना बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ रात्री 1 च्या सुमारास गाठून त्याने सय्यद यांच्यावर चाकूने वार केले होते. त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णलायात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच सय्यद यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. याप्रकरणी प्रविण महाजन याच्याविरोधात भादवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
bottom of page