
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
भु-विकास बँकेच्या कर्जदारांना थकबाकी फेडण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
जळगाव - भु-विकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांकरीता शासन निर्णय दिनांक 24 जुलै, 2015 नुसार एकरक्कमी कर्ज परतफेड (ओ.टी.एस) योजना लागू केलेली होती. दिनांक 20 ऑक्टोबर, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेतंर्गत कर्ज परतफेडीसाठी दिनांक 31 मार्च, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर सक्तीच्या वसुलीव्दारे जमीनलिलाव करुन वसुलीची कार्यवाही केली जाणार आहे. असे अवसायक, जळगाव जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक ली., जळगाव तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. शासनाने जाहीर केलेल्या एकरक्कमी कर्ज परतफेड योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात सभासदांना लाभ मिळत असल्यामुळे जास्तीत जास्त कर्जदार सभासदांनी 31 मार्च, 2021 च्या आत कर्जाची परतफेड करावी. अन्यथा बँकेमार्फत सक्तीच्या वसुलीव्दारे कार्यवाही करण्यात येईल.