top of page

फॅशन स्ट्रीटवरील दुकानदारांचाही शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा

शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्याच्या २१ जिल्ह्य़ांमधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून राजभवनवर मोर्चासाठी मुंबईत रविवारी संध्याकाळी दाखल झाले. हे मोर्चेकरी आझाद मैदानात दाखल झाल्यापासून त्यांना सर्वच स्तरांमधून पाठिंबा दिला जात आहे. या मोर्चामधील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी सहभागी होणार आहेत. मात्र या मोर्चाला आता मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटवरील दुकानादारांनाही पाठिंबा दर्शवत आज दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

bottom of page