top of page

... तर कोणतंही लक्ष्य अवघड नाही - मोदी

कर्नाटक-केरळ या दोन राज्यांना जोडणाऱ्या कोच्ची-मंगळुरू गॅस पाईपलाई पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला अर्पण केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वार मोदींनी योजनेचं उद्घाटन केलं. विकासाला प्राधान्य देऊन सर्वांनी सोबत मिळून काम केलं, तर कोणतंही लक्ष्य अवघड नाही. कोच्ची-मंगळुरू गॅस पाईपलाईन याचं मोठं उदाहरण असल्याचे मोडू यांनी सांगितले. आज देशाच्या सर्व भागांमध्ये १६ हजार किमी लांबीची गॅस पाईपलाईन उभारण्याचं काम सुरू आहे. जितकं काम २७ वर्षात झालं, त्याच्या निम्म्या कालावधीत आम्ही त्यापेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. CNG स्टेशनची संख्याही वाढणार आहोत, असं मोदी यांनी सांगितलं.

bottom of page