top of page

पंतप्रधान मोदींचे मराठीतून ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मराठीतून ट्विट केलं आहे. मराठीतून केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ” मी उद्या सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बाळासाहेब विखे पाटील यांचं आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. कृषी आणि सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील. हा कार्यक्रम नक्की बघा” असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

bottom of page