top of page

तीन माजी आमदारांविरोधात गुन्हा दाखल

राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचे निर्देश वारंवार दिले जात आहेत तरीही अकोल्यात २ डिसेंबरला ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा शहरातील स्वराज्य भवन येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चात सुमारे ३०० ते ४०० आंदोलक सहभागी झाले होते. या मोर्चात सोशल डिन्स्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्यामुळे माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार तुकाराम बिडकर या तीन माजी आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

bottom of page