top of page

गैरसमजांमुळे शेतकरी आंदोलन सुरू आहे- नितीश कुमार

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असा इशारा मागील पाच दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. यावर बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले कि, “केंद्र सरकार संबंधित मुद्यांची भीती दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांशी चर्चा करू इच्छित आहे. त्यामुळे मला वाटतं की चर्चा व्हायला हवी. गैरसमजांमुळे आंदोलन सुरू आहे.” असं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.

bottom of page